देश

ना मी मोदींकडे गेलो ना शहांकडे… तरी मला मंत्रीपद मिळालं- रामदास आठवले

नवी दिल्ली | मी ना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो ना भाजपाध्यक्ष अमित शहांना भेटलो तरीही मला थेट मंञिपद मिळालं, असं वक्तव्य केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले यांनी राजधानी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. मंत्रीपद कसं मिळवायचं हे माझ्याकडून शिका असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.

लोकसभा निवडणुकीत रिपाइंने आपल्या पक्षाला एक तरी जागा मिळावी अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणूक रिपाइंने लढली नव्हती. तरीही मंत्रीपदाची माळ आठवलेंच्या गळ्यात पडली.

दरम्यान, शिवसेनेला एक मंञिपद मिळल्यानंतर नेटक-यांनी शिवसेनेची तुलना आठवलेंशी करत शिवसेनेला ट्रोल केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-वायनाडच्या 40 टक्के मुसलमानांनी राहुल गांधींना विजयी केलंय- असदुद्धीन ओवैसी

-विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

-या कामगिरीमुळे युवराज सिंगला कुणीही विसरू शकणार नाही…!

-‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या