बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा

नवी दिल्ली | 127 वे संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाला राज्यसभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पाठिंबा दिला. पाठिंबा देताना आठवलेंनी कविता सादर केली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा मोदी जी से मत लो पंगा, असा इशारा रामदास आठवलेंनी विरोधकांना दिला आहे. यानंतर विरोधकांनी जोरदार नारेबाजी केली.

मेरा बहुत आनंदी है मन, मंजूर हुआ है 127 वा संशोधन, खुश हो जायेंगे ओबीसी, एस सी बी सी जन, जो करती है काँग्रेस और विरोधीयोपर वार, वो है मोदी सरकार, 2024 में मोदीजी के लिये खुल जयेंगा सत्ता द्वार, प्रधानमंत्रीपद पर मोदीजी होजायेंगे स्वार, अशा शब्दात आठवलेंनी मोदींचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, लोकसभेत 127 घटना दुरूस्ती विधेयक मंजूर झालं आहे. राज्यसभेतही हे बिल मंजूर झालं. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यांना जातींना मागास ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी संविधानाच्या कलम 342 अ मध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याशिवाय संविधानाच्या कलम 338 ब आणि 366 मध्ये बदल करण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! संजय राठोडांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोस्टाने पोलिसात तक्रार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! ‘त्या’ नकली फोन कॉलमुळे मंत्रालयात खळबळ

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More