अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले
मुंबई | अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचं चित्रीकरण करू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी दिलेल्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचं चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं संरक्षण करेल, असं रामदास आठवले म्हणाले.
नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणं योग्य नाही, असंही आठवले म्हणाले.
मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला.
दरम्यान, देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला होता.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!
आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत
शर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…
शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!
“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”
Comments are closed.