मुंबई | लॉकडाऊनमुळे अनेकजण अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ऐश्वर्या राणे त्यांच्या मूळगावी सिंधुदुर्गाकडे जायला निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं नाही. त्या मुंबईत अडकून पडल्या आहेत. त्यांना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या घरात आसरा दिला आहे.
सध्या कोरोनाच्या कठीण काळात अनेक जण आपापपल्या परीने होईल ती मदत गरजू व्यक्तींना करत आहे. आठवलेंनी देखील आपला माणुसकी धर्म जपत ऐश्वर्या राणे यांना आपल्या घरात ठेऊन त्यांची योग्य ती व्यवस्था करत त्यांना मदतीचा हात दिला आहे.
तुम्ही हे तुमचं घर समजा. लॉकडाऊन संपेपर्यंत आता घरी जायचं नाही. आमच्याकडेच रहा, असं आठवले कुटुंबियांनी त्यांना सांगितल्याचं राणेंनी सांगितलं. मला घरच्या व्यक्तीसारखं आठवले कुटुंब माझ्याकडे लक्ष देत असल्याचं राणे यावेळी म्हटल्या.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यामुळे लॉकडाऊन झाल्यापासून रामदास आठवले त्यांच्या वांद्रे येथील ‘संविधान’ या बंगल्यावर गरजू नागरिकांसाठी नित्यनियमाने अन्नधान्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था करीत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी
‘…म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही’; कमलनाथांनी केला मोठा खुलासा
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य सरकारने केल्या गाईडलाईन्स जारी
कोरोना वाॅरिअर्ससाठी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं
Comments are closed.