रामदास आठवलेंना खरंच परिस्थितीचं गांभीर्य आहे का?

मुंबई | कोरेगाव भीमा हिंसाचार आणि त्यानंतर राज्यात अराजकाची परिस्थिती पसरलीय. मात्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मात्र या परिस्थितीचं कितपत गांभीर्य आहे, हा प्रश्न उपस्थित झालाय. 

रामदास आठवले यांचा स्वभाव मिश्किल आहेत. ते कविता करतात. मात्र कोरेगाव भीमा विषयावर आयोजित मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी चक्क कविता केली. न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीवर हा प्रकार घडला. 

“हा तुमचा कार्यक्रम आहे बेधडक, पण मी तर आहे जय भीमचा खडक… मी तसा नाही भडक, पण मी आहे बेधडक”, असं ते म्हणाले.