सिनेमा प्रदर्शित व्हावा, फक्त ‘पद्मावती’चा डान्स तेवढा काढा!

मुंबई | पद्मावती सिनेमा प्रदर्शित होऊ नये या मताचा मी अजिबात नाही, फक्त पद्मावतीचा डान्स तेवढा काढून टाकावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय. ‘पद्मावती’वरुन सध्या जो वाद सुरुय त्यावर ते बोलत होते. 

पद्मावती सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिला देवीचं स्थान आहे. त्यामुळे पद्मावतीला डान्स करताना दाखवणं चुकीचं आहे. डान्स काढून सिनेमा प्रदर्शित करावा, असं रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, मी गुजरातला गेल्यावर हार्दिकला भेटून भाजपला पाठिंबा देण्यास सांगणार आहे. कारण त्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.