बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रविंद्र जडेजाच्या घरी रंगला ‘राजकीय सामना’; नणंद भावजय आमने- सामने

गांधीनगर | भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी आणि बहीण राजकारणात सक्रिय आहेत. क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या रविंद्र जडेजाच्या घरात राजकीय संघर्षाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये नणंद भावजयची जोडी वेगवेगळ्या पक्षात असल्यानं त्यांच्यात वाद सुरू असतात. त्यानंतर आता रविंद्र जडेजाच्या घरातचं राजकीय भांडण रंगल्याचं पहायला मिळतंय.

रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही भाजपमध्ये आहे. तर नयनाबा जडेजा ही काँग्रेस पक्षात आहे. भिन्न पक्षं असल्यामुळे दोघी नणंद भावजयमध्ये टोलेबाजी सुरू असते. गेल्या वर्षी जडेजाची पत्नी रिवाबा ही कारमध्ये असतांना मास्क न घातल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे रिवाबाला अडवलं होतं. गुजरातमधील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रिवाबा जबाबदार असल्याचं नयनाबा जडेजाने म्हटलं होतं.

रिवाबाच्या एका कार्यक्रमात खूप गर्दी जमली होती. त्यावेळी रिवाबानं मास्क देखील घातलं नव्हतं. यावरुन रिवाबाची नणंद नयनाबामुळे कोरोना वाढवल्याचा आरोप केला आहे. नयनाबा जडेजाने केलेल्या आरोपामुळे रविंद्र जडेजाच्या घरातील वातावरण बदललं आहे.

दरम्यान, मास्क न घातल्याने जडेजाची पत्नी रिवाबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध नणंद भावजयची प्रकरण गुजरातेमध्ये चांगलंच गाजतंय.  जडेजाच्या वडिलांनी मुलीची बाजू घेतली आहे.तर नयनाबाला जडेजा साथ देत आहेत. तसेचं रविंद्र जडेजा त्याची पत्नी रिवाबा जडेजाची समाजकार्यात मदत करत असतो.

थोडक्यात बातम्या-

बाबो! मुलाने हात जोडून उकळत्या पाण्यात सुरु केलं ध्यान, पाहा व्हिडीओ

पुण्यात मुसळधार पाऊस! राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘तालिबानी महिला क्रिकेटपटूंना खेळू देणार नसतील तर…’; ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा तालिबान्यांना मोठा दणका!

‘पवारांचा महेबूब शेख ठाकरे सरकारची मेहबूबा”

माकडं विहिरीमध्ये डोकवायची, लोकांकडे पाहायचीत पाहणी केल्यावर सर्वांनाच बसला धक्का!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More