Top News

“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”

मुंबई | शेठजी भटजींच्या काखेत बसुन चळवळीत डंख लावणारी लोकं राजु शेट्टींना एकीकरणाची साद घालत आहेत आणि सोबत राजु शेट्टींनी लुटारूंची संगत सोडावी असंही म्हणत आहेत. मुळात त्यांनीच आधी महाराष्ट्रातील सहकार मोडीत काढणाऱ्यांची वकीली करणं सोडुन द्यायला हवं, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीये.

राजु शेट्टी आपल्या विचारांवर ठाम आहेत रस्ता तर तुम्हीच चुकलात. प्रामाणिक चळवळीवर वार तुम्ही केले आणि आता जिथे आहात तिथल्या लोकांसाठी तुमची गरज संपली आहे त्यामुळेच की काय पुन्हा एकत्रीकरणाची स्वप्ने तुम्हाला पडत आहेत, असा टोला रणजीत बागल यांनी लगावलाय.

राजु शेट्टींसारख्या देव माणसांवर वारंवार शिंतोडे उडवुन बदनामी केली. आणी आता तिथली गरज संपली म्हणुनच की काय आता विचारधारेच्या आणाभाका म्हटल्या जात आहेत, असं रणजीत बागल म्हणाले.

आपलं संपलेलं महत्व वाढवण्यासाठी वारंवार राजु शेट्टींचा मुद्दा औचित्यास आणु नये कारण तुमचे आणि आमचे फक्त रस्तेच वेगळे नाहीत तर हेतुंमध्ये देखील फरक आहे. शेवटी इतकंच म्हणेन गेल्या घरी सुखी रहा, अशी बोचरी टीका रणजीत बागल यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे

‘बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा’; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

“गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही- पंकजा मुंडे


“विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या