मोठी बातमी! ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा
सोलापूर | ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतात QR-कोडेड पाठ्यपुस्तक क्रांती सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी 32 वर्षीय डिसेल यांची ग्लोबल टीचर प्राइज 2020 चे विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर अनेक माध्यमांनी त्यांची नोंद घेतली.
अनेक मुलाखतीमध्ये त्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र सध्या डिसले गुरूजी त्यांच्या शिक्षकीपदाचा राजीनामा (Resigned) दिला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडे दिला आहे. 7 जुलैला त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. याचं कोणतंही कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
मध्यंतरी त्यांना अमेरिकेला (America) उच्च शिक्षणाला जाण्याच्या रजेवरून वाद निर्माण झाला होता. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते 3 वर्षात तिकडे फिरकलेच नसल्याचा आरोप करण्यात आला होता. अनेक घडामोडींमुळे हा चर्चाे विषय बनला होता. यामध्ये स्व: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लक्ष घालावं लागलं होतं. त्यानंतर गायकवाड यांच्या सूचनेनंतर सोलापूर जिल्हापरिषदेवरून त्यांना रजेची परवानगी मिळाली.
यानंतर आता अचानकपणे त्यांनी राजीनामा दिल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी दिलेला राजीनामा रद्द करण्याची अथवा मागे घेण्याची मुदत तीन महिने असते. त्यामुळे आता शिक्षणविभागाची याबद्दल काय भूमिका असेल आणि डिसले राजीनामा परत घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
एवढी मोठी फाटाफूट झाली पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो”
एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका; ‘तो’ आदेशच बदलला
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
कॉमेडियन वीर दासने पुन्हा उडवली भारताची खिल्ली, म्हणाला…
धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त
Comments are closed.