बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे, असं वक्तव्य फडणवीस यांनी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये केलं होतं. फडणवीस यांच्या वक्तव्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांवर काॅंग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

तुमच्यासारख्या नेत्यांमुळे मला मी मुख्यमंत्री नाही असं जाणवलं नाही. मला आजही वाटतं की मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले होते. यावर जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय, अशी खोचक टिप्पणी रत्नाकर महाजन यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर केली आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टची चर्चा आत सर्वत्र होताना दिसत आहे.

मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्वाचं नाही, तो काय काम करतो ते महत्वाचं आहे. गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे जनतेने मला मी मुख्यमंत्री नसल्याचं कधीच जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करत आहे, असंही फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान, ही चांगलीच गोष्ट आहे की, त्यांना आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय, मात्र जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा शब्द कोणी खेचू शकत नाही, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लगावला आहे. त्यामुळे आता फडणवीसांच्या वक्तव्यावरून येत्या काळात राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नौटंकी सुरू आहे’; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More