खेळ

या व्यक्तीची भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

Loading...

मुंबई |  कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली. रवी शास्त्री पुन्हा एकदा भारताच्या प्रक्षिक्षकपदाचं काम पाहणार आहेत.

प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये शास्त्रींसह माइक हेसन, टॉम मूडी लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि फिल सिमंस यांनी अर्ज केले होते. मात्र कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रवी शास्त्री यांची पुनश्च एकदा निवड केली आहे.

Loading...

सध्या भारतीय संघ विंडिंज दौऱ्यावर आहे. म्हणून त्यांचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं होतं.

दरम्यान, रवी शास्त्री यांचा प्रक्षिक्षकपदाचा कार्यकाळ 2021 पर्यंत असणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-दहीहंडी साजरी करू नका… पूरग्रस्तांना मदत करा- नवाब मलिक

-पूरग्रस्तांसाठी वस्तू नेणाऱ्या टेम्पोला कराडजवळ अपघात

-महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट मात्र दर पावसाळ्यात मुंबई तुंबते- नितीन गडकरी

Loading...

-नरेंद्र मोदींच्या ‘या’ सल्ल्यावर असदुद्दीन ओवैसी भडकले!

-“दबावशाही, झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्य”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या