बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द्

नवी दिल्ली | देशातल्या सर्व बँका सध्या आरबीआयच्या रडारवर आहेत. जिथे काम व्यवस्थित होत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयने अनेक सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यात आता आणखी एका बँकेंची भर पडली आहे.

रिझर्व्ह बँकेने गोवास्थित Madgaum अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. आता ही सहकारी बँक कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवसाय करू शकत नाही. ऑपरेशनसाठी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. याखेरीज भविष्यातील उत्पन्नाबाबतही नियोजन नाही. याशिवाय आरबीआयच्या नियमांनुसार बँक उभी राहण्यास सक्षम नाही, असं आरबीआयने सांगितलं.

बँकेने सादर केलेल्या आकडेवारनुसार Madgaum अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेचे 99 टक्के ठेवीदार एक रूपयाही गमवणार नाहीत. त्यांना विम्याच्या खाली ठेव रक्कम जमा होईल.

दरम्यान, आरबीआयने गोवा सहकारी संस्थांचे निबंधक यांना लवकरात लवकर यासंदर्भात आदेश जारी करून लिक्विडेटर नेमण्यास सांगितलंय. रिझर्व्ह बॅंकेने लिक्विडेशन ऑर्डर दिल्यानंतर ठेवीदारांना DICGC कायदा 1961च्या अंतर्गत विम्याचा लाभ मिळतो.

थोडक्यात बातम्या-

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?”

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 5 वर्षात 7 लाख मिळवा!

“… तर त्यांचे हात-पाय तोडणार, हा महाराष्ट्र आहे…इथं राज ठाकरेंचं राज चालतं”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या बहिणीची पोस्ट व्हायरल, म्हणाली…

…त्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं रहावं लागेल- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More