बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोनाची लाट ओसरत असताना गेल्या दोन दिवसांपासुन कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची चिंता वाढली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणं आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे  राज्य सरकारने ठरवून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक आहे.

दिवसभरात राज्यात 05 हजार 108 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 04 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 159 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 62 लाख 52 हजार 150 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 97.04 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

काबूल विमानतळावरील पाणी बॉटल आणि जेवणाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“नारायण राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

बुधवारी झालेल्या लक्षणीय रूग्णवाढीनंतर पुण्यातील आजची आकडेवारी पाहा एका क्लिकवर!

अफगाणिस्तानमध्ये हाहाकार! काबूल विमानतळावर मोठा स्फोट

“तालिबानी आम्हाला काश्मीर प्रश्नावर मदत करणार आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More