बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद! तब्बल ‘एवढ्या’ नागरिकांनी घेतली लस

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला असतानाच देशात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस आणि भारत बायोटेकची लस मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच काही भागांमध्ये रशियाच्या स्पुतनिक-वी या लसीला देखील देण्यास सुरुवात झाली आहे. देशात खूप वेगाने लसीकरण चालू आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने आज लसीकरणाच्या बाबतीत नवीन विक्रम रचला आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र रोज नवीन विक्रम रचत असल्यानं सर्वच स्तरातून महाराष्ट्राची वाह वाह होत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज महाराष्ट्रात 9 हजार 812 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 8 हजार 752 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 179 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

आतापर्यंत 60 लाख 28 हजार 847 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 81 हजार 551 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 21 हजार 251 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या – 

जेवणात मटण नाही म्हणून नवरदेव पसार अन्…

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मोदी सरकार विरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार? राऊतांनी दिली आतली बातमी

कोरोनाकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत बँकिंग सेक्टरला मात्र अच्छे दिन; नफ्यात दुपटीने वाढ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More