बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिसांनी सुरु केलीय वसुली?, आमदारानं पोस्ट केला धक्कादायक व्हिडीओ

औरंगाबाद | राज्य सरकारवर विरोधक सातत्यानं वसुली सरकार हा आरोप करत असतात. विरोधी पक्ष भाजपकडून सातत्यानं राज्य गृहखात्यावर गंभीर आरोप केले जातात. आता तर भाजप आमदारानं चक्क स्टिंग ऑपरेशन करत लाचखोर पोलिसांचा गैरव्यवहार उघड केला आहे. परिणामी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या फेसबुक पोस्टची सध्या राज्यात चर्चा आहे.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावर कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. परिणामी हा मार्ग वाहतुकीसाठी वापरण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. पण काही पोलीस कर्मचारी लाच घेऊन वाहन सोडत असल्याची घटना कानावर आल्यानं मंगेश चव्हाण यांनी स्वत: गाडी चालवत त्याठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

घाटामध्ये चिरीमिरी घेऊन वाहने सोडली जात आहेत. पोलीस भ्रष्टाचार करत आहेत. मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करत या सर्व प्रकाराला पुढे आणलं आहे. परिणामी मंगेश चव्हाण यांच्या फेसबुक पोस्टनं राज्यात खळबळ माजवली आहे. आपल्याकडूनही पोलिसांनी 500 रूपये घेतल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली पाहीजे. अन्यथा आपण पोलीस महानिरीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.

पाहा पोस्ट 

थोडक्यात बातम्या 

11 अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्या, सिनेसृष्टीत खळबळ उडवणारा प्रकार

दिल्लीवरुन सूत्रं हलणार, प्रणिती शिंदेंना मिळणार ही’ मोठी जबाबदारी?

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More