तंत्रज्ञान

जिओच्या ग्राहकांना आणखी एक धक्का; ‘हे’ स्वस्त डेटा पॅक झाले बंद

मुंबई | जिओव्यतिरीक्त  अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रतिमिनीट दर  आ्कारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता  रिलायन्सने ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे.

जिओने 19 रूपये आणि 52 रूपयांचे दोन स्वस्त प्रिपेड रिचार्ज बंद केले आहेत. एक दिवस आणि सात दिवस इतकी या पॅकची वैधता होती. हे पॅक बंद झाल्यामुळे ग्राहकांना किमान 98 रूपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्जसाठी उपलब्घ असणार आहे.

बंद केलेल्या 19 रूपयांच्या रिचार्जवर अमर्यादित कॉलिंग आणि 150 एमबी डाटा मिळत होता. तसेच त्याशिवाय 20 SMS देखील मिळत होते. मात्र आता जिओने हे दोन्ही प्लॅन्स बंद केले आहेत.

दरम्यान, बंद केलेले अन्य रिचार्ज प्लॅन 2020 मध्ये पुन्हा लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ट्रायकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या  बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या