बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | राज्यात सध्या मुंबईतील कथित क्रूझ प्रकरण चांगलंच राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे.‌ राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच यासंबंधीचे सर्व पुरावे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. नवाब मलिक यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना आता हे प्रकरण शेवटाकडे घेवून जावे लागेल, असा सूचक इशारा फडणवीस यांनी मलिक यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या इशाऱ्याला नवाब मलिक यांनी फक्त तीन शब्दात ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. मलिक यांनी फडणवीस यांना ट्विट मध्ये मेंशन करत हैं तैयार हम, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून म्हटलं आहे की, दिवाळीच्या आधी सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो मलिक यांनी ट्विट केला आहे, तो चार वर्षांपूर्वीचा आहे. मलिक यांनी जाणूनबुजून माझ्या पत्नीचा फोटो प्रसारित केला आहे. त्यामधून त्यांची मानसिकता दिसत आहे. तसेच त्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही कारण, रिव्हर मार्चने सांगितलं आहे की ती भाड्याने आणलेला माणूस आहे, असा फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे नावाचा माणूस फडणवीस यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटायचा. मागील काळात फडणवीस आणि ठाकरे यांच्या मधील नाते खराब होत होते. फडणवीस यांचा निरोप घेवून गूंडे हा ठाकरेंकडे जायचा. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना देखील गुंडे भाजप आणि शिवसेना युतीसाठी प्रयत्न करत होता. पण यामध्ये उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

पाहा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

“हमाम में सब नंगे है कारण, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…”

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय- प्रविण दरेकर

’46 रेल्वेस्थानकावर बाँम्बस्फोट’; रेल्वे सुरक्षा दलाला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

“एवढं गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More