बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंदिर नाही, मदिरा सुरु; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा थोडा तरी मान ठेवा”

मुंबई | ही कोणती भूमिका आहे?? मंदिर नाही पण मदिरा सुरु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा. बदला, पण इतकेही बदलू नका, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हाथरसचा निषेध प्रत्येकाने केला पाहिजे पण महाराष्ट्रातील किती भगिनींबद्दल संवेदना दाखवली? अजून किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम तयार करणार ते तरी सांगा, असा सवाल फडणवीसांनी भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत सरकारला केला आहे.

या सरकारकडे एकच काम ते म्हणजे कुणी काही आरोप केला की महाराष्ट्रद्वेषी म्हणायचे आणि भाजपवर टीका करुन मोकळे व्हायचे. सरकारचे काम प्रश्न सोडविण्याचे असते त्याचे भान राज्यकर्त्यांना राहिलेले नसल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More