बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्पात आला आहे. आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्याप्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले त्याप्रमाणे हा न्यायिक लढा सामुहिकपणे लढू. राज्य शासन म्हणून जे काही करता येईल ते सर्व करू, त्यात कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आरक्षणासंदर्भात इथे आणि दिल्लीत आपण जे काही करतो आहोत आणि करणार आहोत त्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

दिल्लीत जिथे कमी पडतो आहोत, असं वाटेल तेथे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी तुम्हाला आम्ही जबाबदारी देत आहोत. आणि मला खात्री आहे की याबाबतीत आपण सगळेजण आपले राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून समाजाच्या आशा आकांक्षा, अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करणार आहोत. सर्व प्रयत्न पणाला लावून हा न्याय हक्काचा लढा लढू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर प्रतिकिया देताना फडणवीस यांनी मराठा आरक्षणात सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं.

प्रसंगी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी मदत करू, केंद्र सरकार आपल्याला सर्व मदत करेल, अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केली. तसेच या बैठकीत मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत विरोधी पक्षासह सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”

पूजा चव्हाणची आजी म्हणणाऱ्या शांताबाईंचं पितळ उघडं, पूजाच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, म्हणाले…

“…तर अशा वादळांची सरकारला आता सवय झालीये”

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More