मुंबई | रिक्षातून घरी जाणाऱ्या एका पत्रकार महिलेसमोर चालकाने अश्लील चाळे केल्याची विकृत घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री मालाडमध्ये ही घटना घडली आहे. या महिलेने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
रात्री घरी जात असताना रिक्षा चालकाने आधी अश्लील चाळे केले. नंतर त्याने अर्ध्या रस्त्यात रिक्षा थांबवत या महिलेसमोरच आपली पँट काढून हस्तमैथुन केले. यामुळे महिलेने घाबरून रिक्षातून पळ काढला. घर जवळ असल्याने बचावल्याचे महिलेने सांगितलं.
दरम्यान, महिलेच्या पोस्टनंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हमे अच्छे दिन नही, वही पुराने दिन चाहिये- छगळ भुजबळ
-देशभरातून तिला ट्रोल केलं जातंय, मात्र त्याकडे लक्ष न देता ती तिचं माणूसपण दाखवतेय!
-मोदी सरकारला मोठा झटका; व्हॉट्सअॅपने अमान्य केली ती मागणी!
-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!
-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन