Top News

अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन- रितेश देशमुख

मुंबई | मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्वर्गिय विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यासंदर्भात विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख याने अजित पवारांचे आभार मानले आहेत.

श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा, असं रितेश देशमुख म्हणाला आहे. रितेशने यासंदर्भात ट्विट केलं आहे.

मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आल्याने रितेश भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. तो ट्विटच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे.

दरम्यान, मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते, असं ट्विट करत अजित पवार यांनी माहिती दिली होती.’

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही”

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण

“शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न मोदींनाच विचारा”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या