बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झंझावाती खेळी करत ऋतुराज गायकवाडने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

नवी दिल्ली | आयपीएलची मोठ्या दणक्यात युएईमध्ये पु्न्हा सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. अतिशय रंगलेल्या या सामन्यात चेन्नई कडून मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने 88 धावांची दणदणीत खेळी केली आहे. अडचणीत सापडलेल्या चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात गायकवाडने महत्वाची भूमिका बजावली आहे.

ऋतुराज गायकवाडने 88 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई संघाला विजय मिळवता आला आहे. आपल्या अर्धशतकासोबतच गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. युएईमध्ये खेळलेल्या आयपीएलमध्ये सलग चार अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम आता ऋतुराज गायकवाडच्या नावावर झाला आहे.

आएपीलमधील आपला जबरधस्त फाॅर्म कायम राखताना गायकवाडने मोठी खेळी साकारली आहे. ऋतुराजने यापूर्वी 2020 च्या आयपीएलमध्ये अखेरचे तीन सामने खेळताना सलग तीन अर्धशतकं ठोकली होती. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्ध 51 चेंडूत नाबाद 65, केकेआरविरुद्ध 53 चेंडूत 72 आणि पंजाबविरुद्ध 44 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावा केल्या होत्या. चेन्नई संघाच्या फलंदाजीचा कणा म्हणून सध्या ऋतुराजला ओळखलं जात आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने या विजयासोबतच गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई आणि चेन्नई हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. ऋतुराजच्या या खेळीने त्याने ऑरेंज कॅपसाठी आपली दावेदारी केली आहे.

थोडक्यात बातम्या 

पोलिसांनी किरीट सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पहिला घोटाळा बाहेर काढताच दवाखान्यात गेले, दुसरा काढला तर….- किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

धक्कादायक! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस; सर्टीफिकेटमध्ये झाला ‘हा’ घोळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More