मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे आज मुंबई, पालघर, ठाणे बंदची हाक दिली आहे. ठाण्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
मराठा आंदोलक आक्रमक झाले असून ठाण्यातील माजीवडा परिसरात रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत. तर टीएमटीच्या बसची हवा काढण्यात आली आहे.
दरम्यान, मराठा आंदोलकांनी केलेल्या रस्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेची पंचाईत होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!
-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा
-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल
-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव