बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजब! ‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’, चोरीनंतर चोराने लिहीलेल्या चिठ्ठीचीच सर्वत्र चर्चा

नवी दिल्ली | चोरीच्या अनेक घटना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, बऱ्याच वेळा या चोऱ्यांदरम्यान काही अजबच किस्से घडतात. आता मध्य प्रदेशमधूनही अशाच एका अजब चोरीचा किस्सा समोर आलाय. चोराने घरात चोरी तर केली वरून घर मालकासाठी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली. त्याने लिहीलेल्या चिठ्ठी पाहून सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला आहे. मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यात ही अजब चोरीची घटना घडली आहे.

या चोराने एका जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात चोरी तर केलीच वरून चोराने ज्या जिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोरी केली त्यांच्यासाठीच चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने लिहीलं. “की जर पैसे नव्हते तर कुलूप लावायचं नव्हतं,कलेक्टर” त्याने लिहीलेली चिट्ठी पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. उपजिल्हाधिकारी त्रिलोचन सिंग गौर यांच्या घरी ही चोरी झाली होती. खाटेगाव तहसील येथे ते काम करतात. 15 ते 20 दिवस ते घरी नव्हते. त्यादरम्यानच त्यांच्या घरी चोरी झाली आणि चोरीनंतर ही भन्नाट चिट्ठी त्यांना सापडली.

गौर 15 ते 20 दिवस घराबाहेर होते. परत आल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं आढळलं. याशिवाय रोख रक्कम आणि दागिने गायब असल्याचं आढळल्याने गौर यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गौर यांच्या घरातून 30 हजार रुपये चोरीला गेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चोराने घरातून दागिने आणि पैसे लंपास केले आणि चोरी करून झाल्यावर त्याच घरातून पेन आणि डायरी मिळवली असावी आणि ती चिट्ठी लिहीली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याशिवाय या चोरीच्या घटनेसंदर्भातील दुसरी भन्नाट गोष्ट म्हणजे या उपजिल्हाधिकाऱ्यांचं घर हे एका आमदार आणि देवासचे उपविभागीय दंडाधिकारी प्रदीप सोनी या दोघांच्या घरांच्या मधोमध आहे. तर पोलिस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून मोजक्याच अंतरावर आहे. असं असतानाही या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याने सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्र बंद: ठाण्यात रिक्षाचालकांवर शिवसैनिकांची दादागिरी, पाहा व्हिडीओ

‘…मग मनसेचा हत्येला पाठिंबा आहे का?’; नवाब मलिक गरजले

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? अरेस्ट वॉरंटसह सीबीआय देशमुखांच्या घरी

‘फक्त शाहरूख खानवर निशाणा साधला जातोय’, आर्यन खान प्रकरणी दोन ज्येष्ठ पत्रकारांमध्येच जुंपली

“दादागिरी करुन महाराष्ट्र बंद केला तर मुंहतोड जवाब देण्यात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More