मुंबई | मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्य सरकारच्या या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून त्यांचं कौतुक करण्यात आलंय.
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले, सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला.
आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला.@AUThackeray https://t.co/3t97xjc1VJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 12, 2020
आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, असा टोलाही रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार- आरोग्यमंत्री
लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी
…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले
‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं