बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसादिनी रोहित पवारांची खास फेसबुक पोस्ट…

मुंबई |   पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज 30 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवार यांनी खास आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारी फेसबुक पोस्ट लिहीली आहे. राजकारणाच्या पलीकडे मैत्री असते हे सिद्ध करणारा माझा मित्र आदित्य ठाकरे… त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “राजकीय भूमिका, विचारसरणी या गोष्टी महत्त्वाच्या असतातच पण त्याहून अधिक महत्वाची असते ती म्हणजे निखळ मैत्री. मैत्रीचं हेच नातं जपणारा माझा मित्र म्हणजे आदित्य जी ठाकरे. या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस अतिषय साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन न करता समाजातील दुर्बल घटकांना मदत करावी, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

फळं आणि भाज्यांद्वारेही पसरु शकतो कोरोना; अशी घ्या काळजी

भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रभाव!

महत्वाच्या बातम्या-

स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांसाठी प्रकाश आंबेडकरांची पीपीई कीटची मागणी

भारतात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, पार केला धक्कादायक आकडा

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी दिशा पटाणीचं स्पेशल ट्विट, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More