रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!

अहमदनगर | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार उमेदवारीसाठी आग्रही आहे. मात्र आता पक्षातून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याचं चित्र आहे.

दोन वर्षांपासून रोहित पवार या मतदारसंघात विविध कामं करत आहेत. त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल. मंजुषा गुंड या नक्की निवडून येतील, असं परहर म्हणाले.

काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. पंचायत समितीतही त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाहीत, त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे आणि त्यामुळेच गुंड यांनाच उमेदवारी मिळावी, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले

-गुन्हा दाखल झाल्यावर आणि कोर्टाने दिलासा दिल्यावर धनंजय मुंडेंचं आक्रमक ट्वीट

-‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना सुचना

-शिवानी सुर्वे का संतापते??? तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं कारण…

-विखेंना शह; काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड