रोहित टिळक प्रकरणी पोलिसांचा सावध पवित्रा, तपासानंतर कार्यवाही

पुणे | काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी कार्यवाही केली जाईल, अशी माहिती परिमंडळ १ चे उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली.

४१ वर्षीय महिलेने रोहित टिळक यांच्या बलात्कार केल्याचे आरोप करत विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली होती. सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज आला नव्हता. त्यावर बोलताना बसवराज तेली यांनी तपासानंतर कार्यवाही करु असं सांगितलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या