मुंबई । बिग बॉसचा 14 वा सीझन रुबीना दिलैकनं जिंकला आहे. तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे. शेवटच्या क्षणी राहुल वैद्य आणि रुबीना यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र रुबीनाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे रुबीना या सीझनची विजेती ठरली आहे.
बिग बॉसचा 14 व्या सीझनचा विजेता कोण असेल याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते. अखेर आज प्रेक्षकांना बिग बॉस सीझन 14 चा विजेता माहित पडला आहे.
सर्वात आधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. राखीनंतर अली गोनी हा कमी वोट मिळाल्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. अली बाहेर पडल्याचा सर्वांना मोठा धक्का बसला.
अली गोनीनंतर निक्की तांबोळी घराबाहेर पडली होती. त्यानंतर बिग बॉस 14 ची विजेता म्हणून रुबीना दिलैकच्या नावाची घोषणा करण्यात आली. राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे.
थोडक्यात बातम्या-
तृणमूल काँग्रेसला धक्का! कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवा
धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या
“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”
‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा
येत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड