‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप
पुणे | कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी एका ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली गेली होती. पुण्यातील कोथरूड पोलीस चौकीत याबाबत तक्रार दाखल करण्यात आलीये. आता या प्रकरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे.
मेधा कुलकर्णी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत या गुऱ्हाळ चालवणाऱ्या दिपाली चव्हाण या गरीब महिलेचा गर्भपात झाला आहे, मेधा कुलकर्णी यांनी एका जीवाचा बळी घेतला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून केली आहे.
कुलकर्णी यांनी सोसायटीमधील राहणाऱ्या नागरिकांसोबत हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गुऱ्हाळ चालवणाऱ्या चव्हाण दामत्यांशी त्यांची बाचाबाची झाली. यावेळी मेधा कुलकर्णी आणि त्याच्यासोबतच्या लोकांनी त्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी हा आरोप फेटाळून लावली आहे. या घटनेकडे इतर पक्षांनी डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज काढून योग्य दिशेने तपास केला पाहिजे, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. तर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी कुलकर्णी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पाहा ट्विट –
मेधा कुलकर्णी, आपण व आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत या गुऱ्हाळ चालविणाऱ्या गरीब महिलेचा गर्भपात झाला आहे,आपण एका जीवाचा बळी घेतला आहे.पुणे पोलिसांनी तपास करून कठोर कारवाई करावी.#pune#[email protected] https://t.co/oM9ojbcIRx
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 19, 2021
थोडक्यात बातम्या-
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार
“नरेंद्र मोदी हे देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष”
“पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही”
फेसबुक, मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा काही काळासाठी ठप्प
“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध, तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार”
Comments are closed.