बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुतिन यांनी मोडला तब्बल 70 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड

मॉस्को | दोन आठवडे उलटले मात्र तरीही रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध अद्यापही सुरूच आहे. युक्रेनमधील अनेक शहरं रशियाकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. युक्रेनमधील अनेक सामान्य नागरिक व सैनिकांसह शेकडो रशियन सैनिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) कोणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून त्यांनी युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. त्यामुळे रशियावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान पुतिन यांनी 70 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. (Russia-Ukraine War)

अमेरिकेसह युरोपीयन देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरिया, म्यानमार, चिली, चीन, क्युबा, इराण आणि सिरियावर 70 वर्षात जेवढे निर्बंध लादले गेले त्यापेक्षा गेल्या 8 वर्षांत रशियावर अधिक निर्बंध लादण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या आठ वर्षात रशियावर सर्वात जास्त आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियाने गेल्या 70 वर्षांचा रेकॉर्ड मोडला असला तरी आर्थिक निर्बंध उठवण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे भविष्यात रशियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या-

‘आप’ संदर्भात गोपीनाथ मुंडेंनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी चर्चेत; पाहा व्हिडीओ

मुंबईतील कपलचा खुल्लम-खुल्ला प्यार, kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार गलेलठ्ठ पगार

जो बायडन यांच्या तिसऱ्या महायुद्धाबद्दलच्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More