बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशिक्षित हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना पळवून नेतात”

नवी दिल्ली | देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी (S.Y.Quraishi) यांनी हिजाब वाद (Hijab Controversy) व ईव्हीएम (EVM) हॅकिंगवर त्याचं स्पष्ट मत मांडलं. तर कुरेशी यांनी यावेळी बोलताना लव्ह जिहादवर (Love Jihad) देखील भाष्य केलं. लव्ह जिहादवर बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कुरेशी चांगलेच चर्चेत आले आहेत.

लव्ह जिहाद हा केवळ प्रचार आहे. यात मुस्लिम मुलांना जास्त धोका असल्याचं कुरेशी म्हणाले. सुशिक्षित हिंदू मुली मुस्लिम मुलांना पळवून नेतात. अशा परिस्थितीत लव्ह जिहादमुळे मुस्लिमांचं अधिक नुकसान होतं, असं खळबळजनक वक्तव्य एस.वाय. कुरेशी यांनी केलं आहे.

जर शीखांना पगडी आणि हिंदूंना शाळांमध्ये सिंदुर लावण्याची परवानगी आहे तर मुस्लिमांना हिजाब घालण्यापासून का रोखले जाते?, असा सवाल कुरेशी यांनी हिजाब वादावर बोलताना विचारला आहे. हिजाब आवश्यक आहे का याचा निर्णय मौलवी घेतील न्यायाधीश नाही, असंही कुरेशी म्हणाले आहेत.

दरम्यान, एस.वाय. कुरेशी यांनी हिजाब वाद व लव्ह जिहादवर केलेल्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली. तर ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड केली असती तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने निवडणूक जिंकली असती, असं वक्तव्य देखील कुरेशी यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रावर आणखी एक संकट, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

नितीन गडकरींचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, सलग सहाव्यांदा पेट्रोल महागलं; वाचा ताजे दर

ipl 2022: हार्दिकची गुजरात टीम राहुलच्या लखनौवर भारी, रंजक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय

पैसा वसूल शेअर! वर्षभरात तब्बल 184 टक्क्यांनी वाढला ‘या’ कंपनीचा शेअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More