Top News

भाजपची कृती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच- सचिन सावंत

मुंबई | कोरोनाच्या संकटात सरकारशी सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. पण गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचे भान राहिलेले दिसत नाही. भाजपची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावलाय.

भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले. लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली. तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता 15 दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

भाजपने यापुढे प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक मोफत वाटावं, अशी खोचक टीका देखील सचिन सावंत यांनी केली आहे.

आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले असताना भाजपचाहा दावा पोकळ व हास्यास्पद असल्याचे दिसते. भाजपला खोटे बोलण्याची सवयच लागलीय, सतत खोटे दावे करणे आणि नंतर तोंडावर आपटणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे, अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय; हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा

‘या’ नेत्याने जाहीर केली राजकीय निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई ते वर्धा पायपीट करत गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या