बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाबद्दल अ‍ॅलर्जी, भाजप देशाचा चेहरा बिघडवत आहे”

मुंबई | यूजीसीने इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. तर राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्तांचा पराक्रम अधोरेखित करण्यात आला आहे. यावरून काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली 1857 ची इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

इतिहासाला धार्मिक आणि जातीयवादी दृष्टिकोनातून पाहणारे मोदी सरकार भारताचे कधीही न भरून येणारे नुकसान करत आहेत. शिक्षण क्षेत्राचे संघ विचारधारेतून राजकीय फायद्यासाठी विकृतीकरण नव्या पिढीला घातक आहे. काँग्रेसने देश घडवला, सहिष्णू वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. भाजप देशाचा चेहरा बिघडवत आहे, असंही सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, अशा प्रकारे पाहा निकाल

महाविकास आघाडीत कुरघोडी सुरुच, सरकारमधील 8 आमदार नाराज

“सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?”

शासकीय वाहने मिळूनही अधिकाऱ्यांनी घेतला वेगळा वाहन भत्ता; पुणे पालिकेला लाखोंचा भुर्दंड

‘माझे नेते अमित शहा, नरेंद्र मोदी’; पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More