Top News महाराष्ट्र मुंबई

“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही”

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत हाती शिवबंधन बांधलं. गेल्या दोन दिवसांमागे त्यांनी पक्षप्रवेश केल्यावर 3 कोटीचं कार्यालय घेतल्याने अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. याच मुद्याचा धागा पकडत कंगणाने मातोंडकर यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर कंगणाच्या ट्विटवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजप आणि भाजपचं हे मोठं षडयंत्र होतं,  हा कबूलीजबाब असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नसल्याचं म्हणत सावंतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांंनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, सचिन सावंतांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘विदर्भवासियांनो मी तुम्हाला वचन देतो की…’; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

“6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’”

अभिमानास्पद! DSP लेकीला आपल्या बापाचा कडक सॅल्यूट

“औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावरून शिवसेनेनं राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी

राजकारणात प्रवेश करणार का?, सोनू सूद म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या