बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या चेंडूमुळे सचिनची बरगडी मोडली, तरीही तो खेळत राहिला’; शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा

मुंबई | जगभर सध्या क्रिकेट विश्वचषकाची चर्चा होत आहे. जगातील 12 देशांच्या संघामध्ये विजेतेपदासाठी जोरदार टक्कर पहायला मिळणार आहे. विश्वचषकाच्या पूर्वी माजी दिग्गज क्रिकेटपटू आपापल्या काळातील कामगिरी बद्दल चर्चा करत आहेत. आता पाकिस्तानचा महान गोलदांज शोएब अख्तर यानं सचिन तेंडूलकरबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

काही वर्षांपूर्वी गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यातील एक प्रसंग शोएब अख्तरनं सांगितला आहे. मी सचिन तेंडूलकरच्या घरी गेलो होतो. त्यावेळी तो म्हणाला की, तू मला गुवाहाटीच्या सामन्यात टाकलेला चेंडू जोरात माझ्या छातीजवळ लागला होता. पण भारतीय संघ अडचणीत असल्यानं =मला खेळावं लागलं होतं. पण नंतर मी जेव्हा दवाखान्यात गेलो तेव्हा समजलं की माझी बरगडी मोडली होती, असं सचिन मला म्हणाल्याचं अख्तरनं म्हटलं आहे.

2016 साली शोएब अख्तर सचिनच्या घरी आला होता. त्यावेळी सचिन तेंडूलकर आणि अख्तर यांच्यात बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाल्याचं अख्तरनं सांगितलं आहे. शोएबच्या पुस्तकात सचिन आणि राहुल द्रविड हे मला घाबरत असल्याबाबत काहीतरी लिहील्याच्या बातम्या तेव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्या सर्व बातम्या खोट्या असल्याचंही शोएब म्हणाला आहे.

दरम्यान, शोएब अख्तरच्या मते सचिन एक चांगला माणूस आहे. मी सचिनला सर्वोत्तम फलंदाज मानतो, असं शोएब म्हणाला आहे. सध्याचा भारतीय संघ खूप मजबूत आहे. पण खेळात काहीही होवू शकतं, असं वक्तव्य शोएब अख्तरनं केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘त्या’ प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले, म्हणाले ‘पोरांची नावं घेऊन…’

धक्कादायक! जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

‘त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?’; भर पत्रकार परिषदेत अजित पवार संतापले

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More