बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात तासभर चर्चा, काँग्रेस आक्रमक

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातच परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यात एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या भेटीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Meeting of Sachin Waze and Parambir Singh)

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यात चर्चा झाल्याने काहीतरी कट शिजत आहे, अशी शंका काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकिलांनी देखील या भेटीवर आक्षेप घेतला आहे. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांकडून या भेटीची चौकशी करण्यात येणार आहे.

परमबीर सिंंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीकरिता अधिकृत परवानगी होती का? तसेच ही भेट कोणी घडवून आणली आहे? त्याचप्रमाणे सचिन वाझेला चांदीवाल आयोगासमोर आणणाऱ्या पथकाची देखील चौकशी देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, चांदीवाल आयोगासमोर जाण्यापुर्वी परमबीर सिंह यांनी सचिन वाझेची भेट घेतली. यावरून काँग्रसचे  मुख्य प्रवक्ते सचिन लोंढे (Sachin Londhe) यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दोन आरोपी, दोन कैदी किंवा चौकशीला पुढे जाणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांना भेटू शकत नाही,अशी नियमावली आहे. नियम असूनही दोघे कसे काय भेटले? दोघांमध्ये काय चर्चा झाली ? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईचं टेन्शन वाढलं! आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

काळजी घ्या! ‘या’ व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जास्त धोका

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना अलर्ट जारी

कॅप्टनने 8 फिल्डर लावले अन् जडेजाने टाकला ‘तो’ थ्रिलर बाॅल पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More