बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर

नवी दिल्ली | सोप्या पद्धतीने जास्त पैसा कमवणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र कामावर न जाताच पगार मिळणं हे आश्चर्यजनक आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. कामगार कामावर न जाता त्याच्या खात्यात 15 वर्षांपासून पगार जमा होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

संबंधित व्यक्ती ही मेडिकल विभागात काम करत होती. 15 वर्षांपुर्वी या व्यक्तीचं त्याच्या बाॅस सोबत भांडण झालं होतं. यादरम्यान त्यानं मॅनेजरला देखील धमकी दिली होती. काही काळानंतर मॅनेजर निवृत्त झाला. यानंतर संबंधित कामगाराने कोणतीच नोटिस न देता ऑफिसला जाणं बंद केलं. सगळ्यात आर्श्चयकारक बाब म्हणजे कामावर नसतानाही या व्यक्तीला प्रत्येक महिन्याचा पगार मिळत राहिला.  असा एकही महिना गेला नाही जेव्हा या व्यक्तीला पैसे मिळाले नाही.

कामगार कामावर नसून देखील त्याच्या खात्यात पगार जात असल्याबाबत एचआर विभाग आणि मॅनेजरला देखील काही कल्पना नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. ऑफिसला येत नसताना देखील या माणसाला पगार कसा काय देण्यात आला याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

दरम्यान, संबंधित कामगाराची अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही, तसेच त्याचा देखील काही पता नाही. संबंधित प्रकरणाचा तपास चालू करण्यात आला असून व्यक्तीचा देखील शोध सुरु करण्यात आला आहे. ही संपुर्ण घटना इटलीची आहे.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलमधील या संघाला मोठा धक्का! या भारतीय खेळाडूने घेतला स्पर्धा सोडण्याचा निर्णय

कौतुकास्पद! युवा गोल्फपटूने कोरोना लसीकरणासाठी दिली आतापर्यंतची सर्व कमाई

इंजेक्शन-औषध मिळत नाहीत?, #MahaCovid हॅशटॅग वापरुन एक ट्विट करुन पाहा

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला’; प्रविण तरडेंना अश्रू अनावर

गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More