Top News महाराष्ट्र मुंबई

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते”

मुंबई | केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या मात्र एकाही बैठकीत तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मुखपत्रातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व, आज ते हवेच होते. पंजाबच्या शेतकऱ्यांची साठ दिवस टोलवाटोलवी सुरू आहे. ते पाहिल्यावर अनेकांना वाटलं सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीने आजही महाराष्ट्र आणि देश रोमांचित होऊन उठतो. कारण देश पेटविण्याची किमया त्यांनी वारंवार केली. आज असं नेतृत्व दिसत नसल्याचं म्हणत बाळासाहेबांची उणीव भासत असल्याचं दिसून येत असल्याचं अग्रलेखात सांगितलं आहे.

दरम्यान, बाळासाहेबांचा शब्द म्हणजे न्याय हे कित्येक वर्षे महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवलं असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली?- ब्राह्मण महासंघ

भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य

जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा!

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल!

पुण्यात आगींचं सत्र सुरुच; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या