ही जनताच 2019मध्ये सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल!

उद्धव ठाकरे

मुंबई | महागाईने जनता होरपळलेली असून जनता जागी आहे. ही जनताच 2019मध्ये सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल’, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून हा इशारा दिला आहे. 

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार?. आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारवर आकांडतांडव केले, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत?’, असा घणाघातही अग्रलेखात केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंग्रज बंदुकीने तर भाजप सीबीआयच्या धाकाने देश चालवतो- गुलाब नवी आझाद

-सुप्रीम कोर्टदेखील आमचंच आम्ही राम मंदिर उभारणारच- भाजप आमदार

-संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा; अजित पवारांचा आदेश

-काँग्रेसनं पुकारलेल्या ‘भारत बंद’ साठी राज ठाकरेही उतरणार मैदानात

-धक्कादायक! 63 जागांच्या वादात MPSCच्या 314 जागांच्या नियुक्त्या रखडल्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या