संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार बंद पाडला

औरंगाबाद | शेतकरी संपाला धार चढताना दिसत आहे. चिखलठाण्यात याचा प्रत्यय आला. संभाजी ब्रिगेडने येथील आठवडी बाजार बंद पाडला.

शेतकरी संप असल्याने आठवडी बाजारात मुळात विक्रेत्यांची तसेच ग्राहकांची वर्दळ कमी होती. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विक्रेत्यांना दुकानं गुंडाळण्यास भाग पाडलं. यावेळी किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा