बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझे वडील हिंदू तर आई मुस्लीम, पण मी…’; मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचं प्रत्युत्तर

मुंबई | आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील वादाला आता वेगळंच वळण लागलेलं दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर वानखेडे यांच्यासंबंधित जन्मदाखल्याचा फोटो आणि पहिल्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा फोटो शेअर करत ‘पहचान कौन’? असा मिश्किल सवाल केला आहे. तर जन्मदाखल्याच्या फोटोला ‘यहाॅंसे शुरू हुआ है फर्जीवाडा’, असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. त्या ट्विटमध्ये समीर दाऊद वानखेडे नाव असून त्याचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख केला आहे. त्यावर समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे.

माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, 30 जून 2007 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्विटरवर माझे वैयक्तिक दस्तऐवज प्रकाशित करणे हे निंदणीय आहे. माझ्या कौटुंबिक गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण आहे. मला माझे कुटुंब, माझे वडील आणि माझ्या दिवंगत आईला बदनाम करण्याचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे, असंही समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

एलपीजी गॅस वापरताय तर तुम्हालाही मिळणार 50 लाखांचा विमा, कसं ते वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More