बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला समन्स बजावला नाही’, ‘त्या’ चर्चांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली | सध्या आर्यन खान प्रकरण चिघळत चाललं असून यामध्ये आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडेही अडकत चाललेले पहायला मिळत आहे. समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले जात आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण वेगवेगळं वळण घेत चाललं आहे. अशातच आता समीर वानखेडे यांना समन्स बजावल्याच्या चर्चा होत असताना त्यांनी आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

समीर वानखेडेंवर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. याचदरम्यान ते काल रात्री दिल्लीत दाखल झाले. वानखेडे दिल्लीत दाखल होताच माध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तर देताना समीर वानखेडे यांनी त्यांना बजावण्यात आलेल्या समन्सच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.

‘मला समन्स बजावण्यात आला नाही’, असं म्हणत समीर वानखेडे यांनी रंगलेल्यां चर्चांना पूर्णविराम लावला आहे. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर चौकशी होणार असून दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, पंच प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपांमुळे या प्रकणाला वेगळं वळण मिळालं. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

आगामी महापालिका निवडणुकीतील युतीबाबत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य!

“शमी त्यांना माफ कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत”

“नरड्यावर पाय देऊन एफआरपी रक्कम वसुल केल्याशिवाय सोडणार नाही”

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते”

“बायको आणि सासुबरोबर तुम्हालाही जेलमध्ये जायचंय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More