पुणे महाराष्ट्र

“राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

पुणे | आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली होती. यानंतर आरपीआयची महिला आघाडी आक्रमक झाली आहे.

रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरावर रिपाइंने मोर्चा काढला.

आरपीआयच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चाकणकर यांच्या घराच्या परिसरात निदर्शने केली. चाकणकर यांच्या छायाचित्राला काळे फासून चपलाचे जोडे देखील मारल्याचं कळतंय.

आठवले साहेब यांच्यावर वक्तव्य केल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. यापुढे रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा संगीता आठवले म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

“मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार”

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाचा दणका; पाहा काय आहे प्रकरण…

‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का’; राष्ट्रवादीचा शेलारांवर पलटवार

‘गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा’; अजित पवारांच्या बापटांना कोपरखळ्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या