पुणे महाराष्ट्र

“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”

पुणे | चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो, असं माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांना 100% निवडून आणू. त्यांचा प्रचारप्रमुख पण मी होईन. कोथरूडमध्ये पण प्रचाराची माझ्याकडेच जबाबदारी होती, असं संजय काकडेंनी सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील जर म्हणाले की, मी पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढवणार आहे. तर त्यांना नक्कीच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असं संजय काकडे म्हणाले.

भाजपचा कोणताही सदस्य नाराज नाही. प्रत्येक पक्षात नाराजी असते. त्यामुळे 19 नगरसेवक फुटतील असं शक्य नाही. निवडणुका समोर आल्या की अशा चर्चा समोर येत असतात. आमच्या विरोधी पक्षाने अशा चर्चा केल्या असतील, असंही संजय काकडे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील नोकर भरतीबाबत नितीन राऊत यांची मोठी घोषणा!

“विधान परिषदेत सावरकरांचा फोटो लावणं हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान”

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

भाजपने निलेश राणेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या