मनसेच्या गुंडांना आवरा, सलमानच्या ‘टायगर’ला सुरक्षा द्या!

मुंबई | मराठी सिनेमा विरूद्ध हिंदी सिनेमा या वादात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी उडी घेतलीय. त्यांनी थिएटर मालकांची बाजू घेत मनसे विरोधात पुन्हा एकदा बंड पुकारलंय.

मराठी सिनेमांचं संरक्षण गरजेचं आहे परंतु मनसेची गुंडगिरी खपवून घेणार नाही. टायगर जिंदा है सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी पोलिसांनी पूर्ण सुरक्षा द्यावी. मनसेच्या गुंडांना रोखण्यासाठी थिएटर मालकांसाठी सुरक्षा रक्षक द्यावेत, असं ट्वीट त्यांनी केलंय.

दरम्यान, गच्ची आणि देवा हे मराठी चित्रपटांसोबत सलमानच्या टायगर जिंदा है हा सिनेमाही येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. त्यामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं कठीण झालंय.