मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे; संजय निरुपमांचा आरोप

मुंबई | वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. नरभक्षक अवनी वाघिणीला मारल्याचे पडसाद सध्या उमटत आहेत. 

अवनी वाघिणीला मारण्यासाठी सरकारने 5 कोटी रुपये खर्च केले. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावरूवन मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असं निरुपम यांनी म्हटलं.

अवनी वाघीणीच्या हत्येच्या निषेधार्थ 11 नोव्हेंबरला ग्लोबल मार्च काढण्यात येणार आहे

.वरळी सिफेस ते शिवाजी पार्क असा हा मार्च असणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!