Top News महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेवरून संजय राऊतांची राज्यपालांवर टीका, म्हणाले..

मुंबई  | महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष संपत आले आहे, पण ‘लॉक डाऊन’ संपलेले नाही आणि कोरोनाचे थैमानही नियंत्रणात आलेले नाही. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ‘कोरोना’ने जोर पकडला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर. तेथेही कोरोनाचे संकट मोठे आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत ठाणे, कोकणसह मोठा भाग येतो. त्यातील परिस्थिती काय राजभवनास अवगत नसावी?, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी करत कोरोनाशी लढायचे की यंत्रणा अंतिम परीक्षा घेण्याच्या कामी लावायची, यावर राज्यपालांनीच मार्गदर्शन करायला हवे, असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मोठी शैक्षणिक परंपरा आहे. इथे इतर राज्यांप्रमाणे शैक्षणिक गोंधळ नाही. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर येथील विद्यापीठातील पदव्यांना प्रतिष्ठा आहे व जगभरातील हजारो विद्यार्थी येथे शिकत आहेत. कारण येथे अभ्यासक्रम आणि परीक्षांना एक वेगळा दर्जा आहे. कोणत्याही प्रकारची शैक्षणिक लफंगेगिरी येथे चालवली जात नाही, पण कोरोनापुढे सगळ्यांनीच हात टेकले तेथे विद्यापीठे तरी काय करणार? 10 लाखांवर विद्यार्थी परीक्षा केंद्रवार येणार कसे? त्यांची व्यवस्था कशी करायची? कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक तेथे पोहोचणार कसे? परीक्षांच्या माध्यमातून कोरोनाचे ‘संक्रमण’ वाढले तर कसे करायचे?, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शाळा व महाविद्यालयांचा ताबा ‘क्वारंटाईन सेंटर्स’साठी सरकारने घेतला आहे. सेंट झेवियर्स, रूपारेल, जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था व जिल्ह्याजिल्ह्यांतील कॉलेजेस याच कामासाठी सरकारने ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रे कोठे निर्माण करावीत?, असा सवाल करत राज्य सरकारला अशा शैक्षणिक आणीबाणीच्या काळात परीक्षा न घेण्याचा किंवा बेमुदत पुढे ढकलण्याचा अधिकार आहे, असंही सांगायला राऊत विसरले नाहीत.

परीक्षेला विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्व आहे. परीक्षांशिवाय पदव्या ही कल्पना महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेस परवडणारी नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकेल. राज्यपालांना महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची चिंता किंवा घोर लागून राहिला आहे. त्यामुळे त्यांनीच त्यावर मार्ग काढायला हवा, पण कोरोनाच्या अग्निपरिक्षेतून बाहेर पडल्याशिवाय विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या?, असं राऊत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

आपल्या घामाने महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा ठाकरे सरकार छळ करतंय- योगी आदित्यनाथ

ईदच्या निमित्ताने करूणा आणि बंधुता वाढावी; पंतप्रधान मोदींकडून ईदच्या शुभेच्छा

ही यादी घ्या, पण गाड्या योग्य स्टेशनवरच पोहचवा; राऊताचं रेल्वेमंत्र्यांना कडक प्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या