भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता; संजय राऊतांची जीभ घसरली

मुंबई | भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कानून आमच्यासाठी बनवण्यात आला नाही. आम्ही हवा तेव्हा बदलू, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.

सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. आचारसंहिता चालू आहे. मात्र जे मनात आहे ते बाहेर नाही आलं की श्वास काेंडल्यासारख होतं, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

मनातलं बोलायला कशाला लागते आचारसंहिता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-“विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये”

-मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष; भाजप-काँग्रेसलाही टाकले मागे

-राज ठाकरेंच्या सभांना मागणी वाढली; आता हे उमेदवार म्हणतात माझ्या मतदारसंघात सभा घ्या!

-…म्हणून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडत नाहीत- बाळासाहेब थोरात

-मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे- अशोक चव्हाण