मुंबई | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप-सेनेमध्ये पुन्हा एकदा जुंपलेली पाहायला मिळत आहे. भाजप (BJP) नेत्यांकडून शिवसेनेच्या (Shivsena) हिंदुत्वावर टीका करण्यात आली होती. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपचं हिंदुत्व त्वचेसारखं आहे. तर शिवसेनेचं हिंदुत्व शालीसारखं आहे, अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली होती. या टीकेवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपवाले कधीपासून हिंदु झाले पाहावं लागेल, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. शिवचरीत्रातून आजही प्रेरणा मिळते. दिल्लीचं तख्त वापरून महाराष्ट्राला झुकवू असा कुणी समज करून घेऊ नये, असा अप्रत्यक्ष टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शत्रू समोर झुकणार नाही. महाराष्ट्र कायम लढत राहणार. आम्ही स्वाभिमानासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी लढत राहू, असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शेकडो नागरिकांनी आश्रय घेतलेली ‘ती’ इमारत रशियाकडून उद्ध्वस्त
“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार”
मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने जगाचं टेंशन वाढलं
‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो…’,करूणा शर्मांचं खळबळजनक वक्तव्य
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
Comments are closed.